Young Man Drowns । मध्यप्रदेशातील भोपाळमधून सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. धरणात पडलेल्या कुत्र्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेल्या उच्चशिक्षित तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. भोपाळ NIT मधील BTech ग्रॅज्युएट असलेल्या तरुणाने बुधवारी सकाळी आपल्या मैत्रिणीचा पाळीव कुत्र्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारल्याने धरणाच्या जलाशयात बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Bhopal, Madhya Pradesh News)
Maratha Reservation । मराठा आरक्षणासंदर्भात समोर आली सर्वात मोठी अपडेट!
किशोर सरल निगम असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण 23 वर्षाचा असून तो एकुलता एक मुलगा होता आणि MANIT मधून अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर UPSC परीक्षेची तयारी करत होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मैत्रिणीने कुत्रा पाळला होता. तो कुत्रा धरणाच्या पाण्यात पडला. तो बुडेल म्हणून त्याला वाचवण्यासाठी हा २३ वर्षीय तरुण धरणाच्या पाण्यात उताराला आणि कुत्र्याला वाचवण्याच्या नादात तरुणाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
Accidents Prone Time In India । भारतात सर्वाधिक अपघात कधी होतात? जाणून घ्या महत्वाची माहिती
सकाळी 8.30 च्या सुमारास कुत्रा पाण्यात पडला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी तरुणाचा शोध सुरु केला. तासाभरानंतर त्याचा मृतदेह सापडला. तो 10-15 फूट पाण्यात बुडाल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या अचानक जाण्याने आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे.