बाईक स्टंट करणाऱ्या मुलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. स्टंट करण्यासाठी तरुण वर्ग जीव धोक्यात घालायला तयार असतात. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही मुले बाईकवर एक जीवावर बेतणार स्टंट करताना दिसत आहेत.
करण जोहरने केला मोठा खुलासा; म्हणाला, “मला अनुष्काचं करिअर उद्ध्वस्त…”
या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, 3 मुले स्प्लेंडर बाईक चालवत आहेत आणि रस्त्याच्या मधोमध सापासारखी बाईक चालवत आहेत. त्यांनतर काही क्षणांत बाईकचा तोल बिघडतो आणि बाईक रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकावर आदळल्याचे व्हिडिओत तुम्हाला दिसत आहे. तिन्ही मुले दुचाकीवरून खाली पडतात. तिघांच्या मागून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने ही घटना कॅमेऱ्यात कैद केली, ज्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
मोठी बातमी! रिझर्व बँकेने व्याजदर ठेवले ‘जैसे थे’
@NehaAgarwal_97 नावाच्या युजरने 29 मार्च रोजी हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला होता. कॅप्शनमध्ये लिहिले आहे- और कर लो मस्ती रोड पर…. या व्हिडिओला आतापर्यंत 32 हजारांहून अधिक व्ह्यूज, 500 लाईक्स आणि अनेक कमेंट्स मिळाल्या आहेत.
जीवे मारण्याच्या धमक्यांबाबत सलमान खानने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “…तर काही लोकांचा”
और कर लो मस्ती रोड पे👇😂 pic.twitter.com/wEBl6m6O4t
— Neha Agarwal (@NehaAgarwal_97) March 29, 2023