Crime News । छ. संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून राज्यात अत्याचाराचे (Crime) प्रमाण खूप वाढले आहे. कायदे कडक करूनही गुन्हेगारांना त्याचा धाक उरलेला नाही. सध्या एक खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने महाराष्ट्र चांगलाच हादरला आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर अत्याचार करून तो व्हिडीओ तिच्या आईला पाठवल्याची घटना समोर आली आहे. यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. (Latest marathi news)
याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात ही धक्कादायक (Crime in Chhatrapati Sambhajinagar) घटना घडली आहे. २० वर्षीय तरुणीला आरोपीने लग्नाचं आमिष दाखवले आणि तिच्यावर बलात्कार केला. इतकेच नाही तर त्यानंतर आरोपीनं पीडित तरुणीचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ शूट करून ते तिच्या आईला पाठवले.
Devendra Fadnavis । निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीसांचा मोठा डाव, शरद पवारांना दिला मोठा धक्का
आरोपीची आणि पीडित तरुणीची एक वर्षापूर्वी ओळख झाली होती. आरोपीने तिला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर अत्याचार केला. अत्याचाराच्या घटनेनंतर आरोपीने तिचे फोटो आणि व्हिडीओ मोबाईलमध्ये काढले. आरोपीने हे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेवर सतत अत्याचार केला. एके दिवशी पीडितेने विरोध करताच आरोपीने तिच्या आईला व्हिडिओ पाठवला. अखेर आरोपीच्या जाचाला कंटाळून पीडितेने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. आरोपीविरोधात तक्रार दाखल केली असून अधीक तपास पोलीस करत आहेत.
Mumbai News । धुलीवंदनाच्या दिवशी भयानक दुर्घटना! समुद्रात पाच विद्यार्थी बुडाले