आजकाल शेतकरी शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करू लागले आहेत. यातून त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळत आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद ( Aurangabad) जिल्ह्यातील पाचोड मधील अक्षय लेंभे या शेतकऱ्याने पारंपरिक पिकातून बाहेर पडत कलिंगडाच्या शेतीचा प्रयोग केलाय. विशेष म्हणजे त्यांचा हा प्रयोग यशस्वी देखील झाला आहे. यामधून अवघ्या तीनच महिन्यांत अक्षय लेंभे यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
अन् स्टेजवरच देवेंद्र फडणवीस यांना भावना झाल्या अनावर; जुन्या आठवणी सांगताना कोसळले रडू
कन्नड तालुक्यातील युवा शेतकरी अक्षय लेंभे मागील तीन वर्षांपासून कलिंगड शेती करत आहेत. दरम्यान कलिंगड हे पीक त्यांनी तीन वेळा घेतलं आहे. यामध्ये अगदी पहिल्यावेळी त्यांना सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यानंतर दुसऱ्यावेळी त्यांनी दोन लाखांचे उत्पन्न घेतले होते. फक्त त्यांनीच नाही तर त्यांच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी देखील कलिंगडाची शेती ( Watermelon Farming) करण्यास सुरुवात केली आहे.
सचिन तेंडुलकरने बनवले तिळगुळ; व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिल्या अनोख्या शुभेच्छा
उत्पन्नाविषयी सांगताना अक्षय लेंभे म्हणतात की, “जर बाजारभाव चांगला राहिल्यास शेतकऱ्याला एकरी ४ लाखांचे उत्पन्न देखील मिळू शकते.” कलिंगड हे तीन महिन्यात येणारे पीक असल्याने अगदी कमी वेळात जास्त आर्थिक फायदा होतो. महत्त्वाची बाब म्हणजे कलिंगडाचे पीक वर्षातून चार वेळा घेता येते.