
जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या आवडीच्या आयपीएल खेळाची लवकरच सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्स ही आयपीएल मधील सर्वात लोकप्रिय टीम समजली जाते. या टीमचे कर्णधारपद यंदाच्या वर्षी देखील रोहित शर्मा ( Rohit Sharma) याच्याकडेच आहे. क्रिकेटच्या जगामध्ये रोहित शर्मा ‘हिटमॅन’ म्हणून ओळखला जातो. या सुप्रसिद्ध हिट खेळाडूची संपत्ती देखील तेवढीच ‘हिट’ आहे अर्थात जास्त आहे!
प्रतीक्षा बागडी ठरली पहिली महिला महाराष्ट्र केसरी! कल्याणी पाटीलला चितपट करून मिळवली गदा
रोहित शर्मा हा भारतीय क्रिकेट संघातील महत्त्वाचा खेळाडू असून मागील काही वर्षांपासून तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स साठी खेळतो. 2021 मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला 15 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. त्यानंतर 2022 मध्ये 16 कोटींमध्ये कायम ठेवले होते. रोहित शर्मा क्रिकेट मधून पैसे कमावतोच मात्र जाहिराती व सोशल मीडियावरून सुद्धा तो भरपूर पैसे कमावतो. त्याची महिन्याची कमाई 1.2 कोटी असून वर्षाला तो 16 कोटींपेक्षा जास्त पैसे कमावतो.
मीडिया अहवालानुसार रोहित शर्माची एकूण संपत्ती 24 मिलियन डॉलर इतकी आहे. म्हणजेच रोहित शर्मा तब्बल 180 कोटींचा मालक आहे. त्याच्याकडे ऑडी, BMW, मर्सिडीज बेंझ, porsche यांसारख्या महागड्या गाड्या आहेत. यामध्ये तीन कोटी रुपयांच्या लॅम्बोर्गिनीचा सुद्धा समावेश आहे. तसेच मुंबईमध्ये 30 कोटींच्या आलिशान घरात तो आपल्या कुटूंबासह राहतो.
मोठी बातमी! प्रसिद्ध हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांच्यावर पैसा घेऊन हवामान अंदाज सांगण्याचा आरोप