Gmail Alert । Gmail ही जगातील सर्वात जास्त वापरली जाणारी ई-मेल (Gmail) सेवा आहे. जगभरात लाखो ग्राहक ही ई-मेल सेवा वापरत आहेत. तुम्ही तुमचा गुगल अकाऊंट मागील दोन वर्षांपासून वापरला नसाल तर वेळीच सावध व्हा. एका विशेष प्रोसेसद्वारे गुगलकडून लाखो जीमेल अकाउंट (Gmail Account) बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जर तुम्हीही या लिस्टमध्ये असाल तर सावधान. (Latest Marathi News)
Viral Video । वडिलांना अचानक हृदयविकाराचा झटका, सैनिक मुलाने केलं असं काही की…सर्वजण पाहतच राहिले
मागील दोन वर्षांपासून ऍक्टिव्ह नसलेले गुगल अकाऊंट बंद (Gmail Account Alert) केले जाणार आहे. यात Gmail, गुगल ड्राईव्ह, गुगल कॅलेंडर गुगल डॉक्स, गुगल मिट, गुगल फोटोज आणि युट्यूब या अकाऊंटचा समावेश आहे. समजा तुम्ही तुमच्या Google खात्यात बराच काळ लॉग इन केले नसेल तर तुमचे खाते बंद (Gmail Account Ban) होईल. तुम्ही सतत जीमेल वापरत असल्यास तुम्ही जीमेलचे सक्रिय वापरकर्ते असाल, तर काळजी करू नका.
तुमचे जीमेल खाते हटवले जाणार नाही. गुगल अकाउंट असणाऱ्या वापरकर्त्यांना (Gmail Account Users) त्यांच्या ईमेलवर संदेश पाठवून खाते बंद करण्याबद्दल सूचित करण्यात येणार आहे. जेणेकरून वापरकर्त्यांना त्यांच्या खात्यांवर डेटा स्टोअर करता येतील. बऱ्याच दिवसापासून ज्या अकाउंट्सचा वापर केला जात नाही असे अकाउंट्स गुगलच्या रडारवर असणार आहेत. हे अकाउंट्स गुगल बंद करणार आहेत.
Sharad Pawar । ‘त्या’ भेटीनंतर शरद पवारांचं सूचक वक्तव्य, म्हणाले; “तुम्हाला लवकरच…”