सुप्रिया सुळे (Supriya Sule) त्यांच्या वक्तव्यामुळे कायमच चर्चेत असतात. त्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. त्याचबरोबर अनेक दौरे देखील करत असतात. दरम्यान, काल त्यांनी इंदापूर (Indapur) दौरा केला आहे. त्यांचा हा दौरा सध्या खूप चर्चेत आहे. यावेळी त्यांनी बोलताना भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे.
मोठी बातमी! २६ जूनला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या येणार बारामतीला
इंदापूर दौऱ्यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “बाहेरून आमच्या महाराष्ट्रात येणार आणि आमची चेष्टा करणार हे अजितबत चालणार नाही. यांचा दिल्लीत गेल्यानंतर करेक्ट कार्यक्रम करते. इकडे येऊन मिजास दाखवायची नाही” असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
लग्न होत नव्हते म्हणून शरद पवारांना दिली जीवे मारण्याची धमकी; तपासात धक्कादायक माहिती उघड
मागच्या आठवड्यामध्ये भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी इंदापूरला येऊन जलजीवन मिशनचे उद्घाटन केले. त्यावेळी तेथील स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले नव्हते. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
बिग ब्रेकिंग! मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर मोठी दुर्घटना, टँकरला लागली भीषण आग
हे ही पाहा