Maratha reservation । परभणी : राज्यात अजूनही मराठा आरक्षणाचा (Maratha reservation protest) प्रश्न प्रलंबित आहे. मराठा समाजाने आरक्षणासाठी आंदोलन देखील केले होते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राज्य सरकारने त्यांच्या सर्व अति मान्य केल्या आहेत. पण मराठा समाज ओबीसीतून आरक्षण मिळावे यावर ठाम आहेत. पण सध्या एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. (Reservation protest)
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी देऊळगाव गात येथील एका शेतमजूर तरूणाने त्याच्या शर्टने पळसाच्या झाडाला गळफास घेवून जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. मराठा आरक्षणात त्याचा समावेश होता. पण समाजाला आरक्षण मिळत नसल्याने तो हवालदिल होताच. त्याच नैराश्यातून त्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे.
या घटनेमुळे परभणी जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जानेवारी महिन्यामध्ये परभणी जिल्ह्यात मराठा आरक्षण मिळावं, यासाठी एका तरुणाने आत्महत्या केली होती. आताही याच जिल्ह्यातून आणखी एका तरुणाने टोकाचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही अनेक तरुणांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे.
Sharad Pawar । शरद पवारांचा भाजपाला पुन्हा धक्का! बडा नेता घेणार भेट