Pune News । पर्यटन बेतलं जीवावर! तरुणाचा १२०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू

Pune News

Pune News । सध्या पर्यटनाचे (Tourism) प्रमाण वाढले आहे. हिवाळ्याच्या दिवसात फिरायला जाणाऱ्यांची संख्या जास्त असते. काही जण सोशल मीडियावर (Social media) प्रसिद्द होण्यासाठी कोणत्याही थराला जातात. यामुळे त्यांचा जीव धोक्यात येतो. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. एका तरुणाचा १२०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (Pune Mulshi News)

Mahadev Betting App । मोठी बातमी! महादेव बेटिंग ॲपच्या मालकाला पोलिसांकडून अटक

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील ही घटना आहे. ताम्हिणीमधील प्लस व्हॅली (Tamhini Plus Valley) परिसरात मित्रासोबत पर्यटनासाठी आलेल्या एका तरुणाचा अंदाजे १२०० फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून रोहन विरेश लोणी (वय २१ वर्ष) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Latest Marathi News)

Ravindra Berde । सिनेसृष्टीवर शोककळा! ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं निधन

रोहन अंघोळीसाठी कुंडात उतरला, परंतु त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. महत्त्वाची बाब म्हणजे त्याला पोहता येत नव्हते, त्यामुळे तो कुंडात बुडू लागला. त्याला मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तोपर्यंत खूप उशीर झाला. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांसह लोणावळा शिवदुर्ग टीम, मुळशी आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी उपस्थित झाली.

Rohit Pawar । रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेवर पोलिसांचा लाठीचार्ज, कार्यकर्ते आक्रमक

Spread the love