YouTube । युट्युबनं आणलं नवीन AI फीचर! मिनिटात होणार व्हिडीओ एडिट

YouTube brought a new AI feature! Video editing will be done in minutes

YouTube । गुगलची मालकी असणाऱ्या युट्युबचे असंख्य वापरकर्ते (YouTube Users) आहेत. यावर युजर्सना वेगवेगळ्या विषयांची माहिती मिळते. मनोरंजनाचे साधन म्हणून याकडे पाहिले जाते. विशेष म्हणजे यावर युजर्सना कमाईदेखील करता येते. युट्युब आपल्या युजर्ससाठी सतत नवनवीन फीचर्स (YouTube Features) घेऊन येत असते. ज्याचा फायदा युजर्सना होतो. असेच एक फीचर युट्युबनं आणले आहे. (YouTube New Features)

Shivsena । श्रीकांत शिंदेसह शिंदे गटाच्या सर्व खासदारांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढावी लागेल; कुणाचा दावा?

हे फीचर आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर (AI) आधारित असून याच्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून इमेज, टेक्स्ट, म्यूजिकसह इतर मीडिया सर्च करण्याचा पर्याय मिळतो. शिवाय यात ड्रीम स्क्रीनसह युट्युब क्रिएट पर्यंत अनेक फीचर मिळतील. त्यापैकी ड्रीम स्क्रीन हे नवीन जनरेटिव्ह एआय फीचर (Generative AI feature) असून याच्या मदतीनं क्रिएटर्सना एक विचार टाइप करून शॉर्ट्स किंवा व्हिडीओमध्ये अ‍ॅड करता येणार आहेत. शॉर्ट्ससाठी नवीन सेटिंग्स बनवता येतील.

Love Story । ऐकावं ते नवलच! 35 वर्षीय पाकिस्तानी व्यक्तीने कॅनडातील 70 वर्षीय ‘आजी’सोबत थाटला संसार

कोणाशी करणार स्पर्धा?

हे फीचर टिकटॉक आणि इन्स्टाग्राम रील्सला चांगली टक्कर देईल, कारण यात एडिटिंग ऑप्शन दिले आहेत. एकूण ७० बिलियनपेक्षा जास्त लोक दररोज शॉर्ट्स पाहत असल्याने नवीन AI टूल्स लाँच करून जास्तीत जास्त वापरकर्त्यांना आकर्षित करण्याचा युट्युबचा उद्देश आहे.

Supriya Sule । भाजपच्या खासदाराविरोधी सुप्रिया सुळे यांनी दिली हक्कभंगाची नोटीस, महत्त्वाचं कारण आलं समोर

या देशात आहे उपलब्ध

हे अ‍ॅप भारत,यूएसए, सिंगापूर, जर्मनी, कोरिया, युनायटेड किंगडम, फ्रांस आणि इंडोनेशियासह काही निवडक बाजारात अँड्रॉइडवर बीटा स्टेजवर उपलब्ध आहे. हे अ‍ॅप मोफत असल्याने तुम्ही ते प्ले स्टोरवर जाऊन इंस्टाल करू शकता. त्यासाठी तुम्हाला ‘युट्युब क्रिएट’ सर्च करावे लागणार आहे.

Buldhana Accident । समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर

Spread the love