मुंबई : विनायक माळी(vinayak mali) या तरुणाने सध्या युट्युबवर आपल्या गावरान भाषेत म्हणजेच आगरी(Aagari language) भाषेत बनवलेल्या व्हिडीओंनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्याच्या भन्नाट व्हिडीओंनी (video)सर्वांना अक्षरशः वेड लावलं विनायक माळी आता युट्युबवर राजा बनला आहे. विनायक माळी म्हणजे सर्वांचा लाडका दादूस.
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत दादूसचे असंख्य चाहते आहेत. शेठ माणूस…शेठ बोल शेठ…, काय रं बावलट…या डायलॉगमुळे त्याने लोकांची मनं जिंकली. त्याच्या व्हिडीओला मिलियन्समध्ये व्ह्यूज असतात. शेठ माणूस, गर्लफ्रेंड, माझी बायको या सीरिज प्रचंड गाजताहेत.यूट्युबवर तब्बल २.३६ मिलियन सबस्क्रायबर्स आहेत.
Crime : धक्कादायक ! गरिबीला कंटाळून पित्यानेच घेतला ११ महिन्याच्या बाळाचा जीव
विनायक माळी ते दादूसचा प्रवास
विनायक माळी ते सर्वांचा लाडका दादूस(Dadus) हा प्रवास त्याच्यासाठी अवघड होतं. बऱ्याच समस्यांना दादुसला समोर जावं लागलं. दादुसने गावरान आगरी भाषा घराघरात प्रथम हिंदी भाषेतून पोहचवली. पण हिंदीत त्याला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी त्याने आपल्याच भाषेत म्हणजेच मराठी भाषेत मजेशीर व्हिडीओ बनवायला सुरुवात केली अन् लोकांना ते प्रचंड आवडले. असेच गावरान आगरी भाषेतून व्हिडिओ बनवून त्यानं चाहत्यांची मन जिंकली आणि विनायक माळी सगळ्यांसाठी ‘स्टार’ झाला. मागील काही दिवसांपासून ‘घेतली एकदाची’ म्हणत मर्सिडिज गाडीचा व्हिडीओ शेअर केला होता. या यशाचं श्रेय तो संपूर्ण टीमला नेहमीच देतो.