Site icon e लोकहित | Marathi News

Yuvraj Pathare । मोठी बातमी! शिवसेना नगरसेवकावर प्राणघातक हल्ला

Yuvraj Pathare

Yuvraj Pathare । मागच्या काही दिवसापासून राज्यात बऱ्याच गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. या सर्व घटना चर्चेत असतानाच अहमदनगर जिल्ह्यात पारनेरमध्ये भर दिवसा नगरसेवकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला असल्याची माहिती समोर आली आहे. वसेनेचे नगरसेवक युवराज पांढरे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. (Yuvraj Pathare Firing case Parner )

Eknath Shinde । ‘एकनाथ शिंदे यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा पराभव’, राज्यसभेच्या उमेदवारावर बड्या नेत्याचा धक्कादायक दावा

याबाबत अधिक माहिती अशी की, पारनेर शहरातील मुख्य परिसरातील हॉटेल दिग्विजय मध्ये युवराज पठारे आपल्या समर्थकांसोबत येत होते . यावेळी ते येण्याआधी काही तरुण त्या ठिकाणी येऊन बसले होते. यानंतर पठारे हॉटेलमध्ये येताच त्या ठिकाणी बसलेल्या तरुणांपैकी एकाने उठून गावठी कट्टा पठारे यांच्या छातीला लावला. यावेळी पिस्तुलाचा खटका आरोपीने दाबला मात्र फक्त आवाज झाला गोळी चालली नाही.

Rohit Pawar । मोठी बातमी! रोहित पवारांनी अजित पवरांचा ‘तो’ व्हिडीओ केला सोशल मीडियावर व्हायरल

यानंतर त्या ठिकाणी मोठी खळबळ उडाली आणि पठारे यांच्या समर्थकाने कट्टा हिसकावून घेतला पठारे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणारा तरुण हा अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी सोबत असलेले दोघेजण त्या ठिकाणाहून पळून गेले आहेत. तेथील उपस्थितांनी आरोपीला चोप देऊन पोलिसांकडे दिले असून आता या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत.

Manoj Jarange Health । चिंताजनक बातमी! मनोज जरांगेंच्या पोटात तीव्र वेदना, प्रकृती आणखी खालावली

Spread the love
Exit mobile version