Zika Virus । काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात झिका विषाणूचा एक रुग्ण आढळून आला होता. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याची चिंता सतावू लागली आहे. झिका रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. ज्या भागात हा रुग्ण पॉझिटिव्ह आढळला त्या भागापासून तीन किलोमीटरपर्यंतच्या परिसरात युद्धपातळीवर तपासणी सुरू आहे.
Aayush Sharma Car Accident Update । सलमानच्या मेहुण्याच्या कार अपघातप्रकरणी समोर आली मोठी अपडेट!
या काळात विशेषत: गरोदर महिलांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले जात आहेत. नाशिक महापालिकेच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 3480 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून 15,718 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. 23 गर्भवती महिलांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. संपूर्ण परिसरात झिका डासांच्या उत्पत्तीचे ठिकाण शोधले जात आहेत. आतापर्यंत 57,217 प्रजनन बिंदूंची तपासणी करण्यात आली आहे.
Promate Xwatch B2 Review । फक्त 2500 रुपयांचे स्मार्टवॉच, खरेदी करावे की नाही? जाणून घ्या
प्रशासनाने सर्वसामान्यांना स्वच्छता राखण्याचे आवाहन केले
स्वच्छ पाणी उघड्यावर साठू देऊ नये, असे आवाहन नाशिक महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांना केले आहे. उघड्या पाण्याचे स्त्रोत झाकून ठेवा. झिका व्हायरसला घाबरण्याची गरज नाही, सर्व नागरिकांनी खबरदारी घ्यावी. दुसरीकडे झिका बाधित रुग्ण आता पूर्णपणे बरा झाला आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण वाढतायेत
राज्यातही कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना झिका व्हायरसबाबत जिल्ह्यात दक्षता घेण्यात येत आहे. 19 डिसेंबर रोजी राज्यात कोरोनाचे 11 नवीन रुग्ण आढळून आले, त्यापैकी 8 रुग्णांची मुंबईत पुष्टी झाली. मुंबईत २७, पुण्यात दोन आणि कोल्हापुरात एक रुग्ण आढळून आला आहे.