Rashmi Barve । नागपूर : लोकसभा निवडणुकीपूर्वीच (Loksabha election) काँग्रेसला (Congress) सतत धक्क्यांवर धक्के बसत आहेत. पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी महायुतीत प्रवेश केला आहे. याचा फटका साहजिकच आगामी निवडणुकीवर होऊ शकतो. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या बड्या नेत्याने उमेदवारी अर्ज दाखल करताच तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून बाद करण्यात आला. (Latest marathi news)
जात प्रमाणपत्र अवैध असल्याने रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला होता. अशातच आता याच कारणामुळं त्यांचं जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द झाला आहे. रश्मी बर्वे यांना सर्वात मोठा दुसरा झटका बसला आहे. विशेष म्हणजे रश्मी बर्वे यांनी जितका काळ घालवला त्या काळातील त्यांच्यावर झालेला सरकारी खर्च वसूल करण्यात येणार आहे.
तपासणीदरम्यान, जात पडताळणी समितीने रश्मी बर्वे यांचं अनुसूचित जातीत चांभार जातीचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द केलं आहे. प्रमाणपत्र रद्द करताच शिवसेनेने रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली. यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंचं मत ऐकून उमेदवारी रद्द केली. यामुळे काँग्रेसला निवडणुकीच्या तोंडावर खूप मोठा धक्का बसला आहे.
Chhatrapati Sambhajinagar Fire । छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू