मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावत (Kangana Ranaut) सोशल मीडियावर कायम चर्चेत असत. आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. कंगणा रणावत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना भेटणार आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबतचा कंगणाचा वाद सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे ठाकरेंच्या नाका खाली टिचुन कंगणा ही भेट घेत असल्याचं म्हटलं जातंय.
नवरात्रीमुळे केळीच्या दरात झाली वाढ, परंतु व्यापारी वर्ग चिंतेत
कंगणाने पालघर साधू हत्याकांडानंतर उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला होता. त्याचबरोबर तिने मुंबईची (Mumbai) तुलना अप्रत्यक्षरित्या POKशी केली होती. त्यानंतर कंगनाच्या बंगल्याच्या अनधिकृत भागावर बुलडोझर देखील चालवण्यात आला. यावेळी कंगना ठाकरेंना म्हणाली होती, माझं घर तुटलंय उद्या तुमचा अहंकार तुटेल. यांनतर काही काळ हा वाद थांबला पण आता हा वाद पेटण्याची शक्यता आहे.
कोथिंबीरीचे दर भिडले गगनाला, मात्र जनेतेच्या खिशाला कात्री
कंगना राणावत आणि एकनाथ शिंदेची शनिवारी (Saturday) मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे
Diabetes: डायबिटीजसाठी ही भाजी आहे फायदेशीर, कोलेस्टेरॉल लेवलही होते कमी