
मागील अनेक महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज लागला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे व ठाकरे गटाकडून सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या ४ याचिकांवर आज निकाल दिला आहे. यामध्ये सत्तासंघर्षाच्या काळातील राज्यपालांची भूमिका चुकीची असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court) मांडले तसेच उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिल्याने त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देता येणार नाही. असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.
आता यावर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, “40 गद्दारांचा दोन-तीन महिन्यांचा खेळ उरलेला आहे. त्य्याचबरोबर व्हीप हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मानला जाईल. तसेच सुनील प्रभू हेच प्रतोद मानले जातील. असं देखील आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले आहे.
“उद्धव ठाकरेंना ती चूक भोवली…” पाहा नेमकं काय म्हंटल आहे सुप्रीम कोर्टाने
“संविधान सांगत कि विजय सत्याचाच होणार त्यामुळे हे ४० आमदार अपात्रच होणार. याबाबत विधानसभेचे अध्यक्ष सुनावणी घेतील. आजच्या ऑर्डरवर आम्ही स्पष्टपणे पत्रकार परिषद घेऊन माहिती देऊ”, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली आहे.