शेवटी डॉक्टरच तो! मृत्यूनंतरही तब्बल ११ जणांना दिले जीवनदान

After all, he is a doctor! As many as 11 people were given life support even after death

डॉक्टर कुटुंबातील एका डॉक्टर मुलाने स्वतःच्या मृत्यूनंतरही अकरा जणांना जीवनदान दिले आहे. डॉक्टर म्हंटलं की ते देवाचा अवतार असतात, असंच चित्र आपल्यासमोर उभं राहतं आणि तेच चित्र आज सत्यात उतरलं आहे. एका डॉक्टर दांपत्याच्या मुलाने स्वतःच्या मृत्यूनंतरही एक नाही दोन नाही तर तब्बल ११ जणांना जीवनदान दिले आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) पालघरमधील (Palghar) हे प्रकरण खूप चर्चेत आहे. त्या तरुण डॉक्टराने जिवंतपणी जे केलं नाही. ते त्याने मृत्यूनंतर करून दाखवलं आहे.

भीषण अपघात! पंढरपूरवरून परतणाऱ्या ३ भाविकांचा जागीच मृत्यू, तर ७ जण गंभीर जखमी

जिवंत व्यक्तींचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर त्यांच्या जीवाचा आटापीटा करतात. परंतु, हा वेगळाच डॉक्टर आहे ज्याने, मृत्यूनंतर तब्बल ११ लोकांचा जीव वाचवला आहे हे नवलच आहे. एखाद्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारे क्वचितच सापडतात. पण डॉक्टर दांपत्याच्या या मुलाने मृत्यूनंतर बऱ्याच लोकांचे प्राण वाचवले आहेत. हे कसं शक्य आहे,असा सवाल तुमच्या डोक्यात आला असेल.

मोठी बातमी! जयंत पाटील यांची आज ईडी चौकशी; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

साकेत दंडवते असं या डॉक्टरचं नाव आहे. याचे आई वडील दोघेही डॉक्टरच आहेत. ३० वर्षांचा हा तरुण अपघातात गेला आहे. आपला तरुण मुलगा मृत्यू पावल्यानंतर कोणत्या आई-वडिलांना दुःख होत नाही. परंतु साकेतच्या आई-वडिलांनी खूप धडाडीचा निर्णय घेतला आहे. त्या दोघांनी साकेतचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोठी दुर्घटाना! गंगा नदीत ४० लोकांनी भरलेली बोट उलटली; अनेकजण बेपत्ता

या निर्णयामुळे कित्येक लोकांना जीवनदान मिळाले आहे. त्यामुळे साकेतच्या अवयवांच्या मार्फत त्यांचा मुलगा इतर लोकांच्या शरीरात जिवंत आहे. अशी भावना साकेतच्या आई-वडिलांमध्ये आहे. साकेतचे वडील डॉ. विनीत दंडवते (Dr.Vineet dandvat) (IMA) चे अधिकारी आहेत. अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच साकेतच लग्न झालं होतं. अवयव दान करण्यासाठी त्याच्या पत्नीची परवानगी देखील महत्त्वाची होती आणि तिने देखील ही परवानगी दिली. साकेतच्या कुटुंबासमोर खूप मोठी शोककळा पसरलेली असून देखील त्यांनी हा धाडशी निर्णय घेतला. त्यामुळे कित्येक लोकांचे प्राण वाचले आहेत.

Instagram Down | इन्स्टाग्राम झाले ठप्प! पोस्टही होईना…रिप्लायही येईना…युजर्स मात्र हैराण

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *