Ajit Pawar: अजित पवारांनी भाजपा नेते आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठींवर काढला चिमटा; म्हणाले, “याआधी…”

Ajit Pawar took a swipe at BJP leaders and Raj Thackeray's meetings; Said, "Before..."

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार स्थापन झाले.या नवीन सरकारमुळे मोठ्या राजकीय समीकरणं बदलल्याचं आणि अनेक पक्षात फूट पडल्याची पाहायला मिळत आहे. हे नवीन सरकार स्थापन झाल्यापासून गेल्या दोन महिन्यात भाजपाचे अनेक नेते मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी जाऊन आले. एवढंच नव्हे ते नुकतच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ‘गणपती दर्शना’साठी राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थवर जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीगाठींचा विचार केला असता राजकीय वर्तुळात भाजपा-मनसे युतीची चर्चा सुरू झाली असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.

आनंददायक! शेतकऱ्यांना ‘या’ योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 50 टक्के अनुदान; वाचा सविस्तर

दरम्यान या सर्व विषयावर बोलताना विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधकांना चांगलाच चिमटा काढला आहे.
“तुम्हीच ओळखा..याआधी वर्षानुवर्षांपासून गणेशोत्सव साजरी करण्यात येतो. आणि महत्वाची बाब म्हणजे याआधी कोणीही
एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुणी कुणाच्या घरी गणपतीच्या दर्शनाला गेले नाहीत.पण आता प्रवेश करताना कॅमेरा लावला जातो. मग बरोबर गाडी थांबते, कुणीतरी उतरतं. ते आत जातात. नमस्कार करतात. कशाला?”,अहो आम्हीही अनेक ठिकाणी दर्शनाला जातो. पण आम्ही त्यांच्यासारखे कॅमेरे बरोबर घेऊन जात नाही अस देखील अजित पवार म्हणाले.

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाप्पाच्या दर्शनासाठी राणेंच्या निवासस्थानी; भेटीचे सांगितले कारण

पुढे अजित पवार यांनी शिवसेनेच्यचा दसरा मेळाव्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर बाळासाहेबांच्या विधानाची आठवण करून दिली आहे. “महाराष्ट्रातली सगळी जनता वर्षानुवर्ष बघत होती की शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली.आणि
जेव्हापासून शिवसेनेची स्थापना झाली, तेव्हापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्याच सभा शिवाजी पार्कच्या मैदानावर व्हायच्या. आणि महत्वाची बाब म्हणजे शेवटी त्याचं शिवाजी पार्कच्या मैदानावर बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की इथून पुढे ही शिवसेना उद्धव ठाकरे पाहतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली चालेल”, असं अजित पवार म्हणाले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *