लग्नसमारंभ किंवा इतर शुभ कार्यक्रमांमध्ये जेवणात गोडाचा पदार्थ हमखास असतो! यामध्ये बऱ्याचदा गुलाबजामला (Gulabjam) जास्त पसंती असते. दरम्यान पुण्यातील ( Pune) एका लग्नात गुलाबजाम वरून जोरदार हाणामारी झाली. लग्नात उरलेला गुलाबजाम घरी कोण नेणार ? यावरून केटरर्स मॅनेजर व नातेवाईक यांच्यात भांडणे झाली. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. ( Fighting at wedding )
विराट कोहलीने रोहित शर्माबाबत केला मोठा खुलासा! म्हणाला, “रोहितची ‘ही’ सवय घातक…
पुण्यातील शेळकेवाडी येथे राजयोग मंगल कार्यालयात लोखंडे व कांबळे कुटुंबियांचे लग्न होते. या लग्नात खानपानाचे काम केटरर्सवाले करत होते. दीडच्या सुमारास लग्न सोहळा पार पडल्यानंतर सर्व पाहुण्यांनी जेवण केले. यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास वरपक्षाकडील मंडळींनी उरलेले अन्न सोबत घेऊन जाणार असल्याचे सांगितले. याबाबत केटरर्सवाल्यांना कोणतीच अडचण न्हवती.
Uorfi Jawed: उर्फी जावेदची संपत्ती ऐकून बसेल धक्का; महिन्याला कमावते इतके रुपये
वरपक्ष डब्बे भरत होता. मात्र त्यातल्या एकाने गुलाबजामचा मुरंबा भरायला सुरुवात केली. परंतु, “हे गुलाबजाम तुमचे नाहीत. उद्याच्या लग्नासाठी तयार केलेले आहेत. ते घेऊ नका” असे केटरर्सवाल्यांनी सांगितले. यामुळे केटरर्स मॅनेजर व वरपक्ष यांच्यात शाब्दिक वाद वाढला. त्यातल्या तिघांनी केटरर्स मॅनेजरला बेदम मारले व लोखंडाने जखमी केले.
राज्यात पावसाचा रुद्रावतार! १० जणांचा झाला मृत्यु; पाळीव प्राण्यांनी देखील गमावला जीव