राज्यात पावसाचा रुद्रावतार! १० जणांचा झाला मृत्यु; पाळीव प्राण्यांनी देखील गमावला जीव

Rain in the state! 10 people died; Pets also lost their lives

राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोर धरला आहे. ( Heavy Rain Fall in Maharashtra) याचा फटका शेतातील पिकांना बसत आहे. यामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. आधीच्या अवकाळी पावसात झालेले नुकसान अजून भरून मिळाले नाही. इतक्यात पुन्हा एकदा शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे. राज्यात नुकताच मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व अन्य भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या पावसामुळे मराठवाड्यातील 10 जणांचा जागीच मृत्यु झाला आहे. Death cases due to heavy rainfall

रत्नागिरी रिफायनरी बाबत घेण्यात आले महत्त्वाचे निर्णय! उदय सामंत यांनी घेतली महत्त्वाची बैठक

याशिवाय अवकाळी पावसात विदर्भ, मध्य प्रदेशकडून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर कापसाची गाठी घेऊन जाणारा ट्रक अचानक रस्त्यावर अचानक पलटी झाला आहे. भर पावसात कापसाचा ट्रक पलटी झाल्याने कापसाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात महामार्गावर ही घटना घडली.

गौतमी पाटील कोणासमोरही नाचेल तुला काय त्रास आहे? अजित पवारांचा मिश्किल टोमणा!

अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील एकूण १५३ गावांना फटका बसला आहे. यामध्ये जालन्यातील १०१, हिंगोलीतील ३८ आणि उस्मानाबादमधील १४ गावांचा समावेश आहे. दरम्यान अवकाळी पावसामध्ये नांदेड मधील ६ , लातूरमधील २, उस्मानाबाद १ व बीड मधील एकाचा मृत्यु झाला आहे. एवढंच नाही तर गेल्या ७२ तासांत ११७८ कोंबड्या आणि १४७ पाळीव प्राण्यांचा मृत्यु झाला आहे.

चोरी करताना पाहिले म्हणून महिलेची हत्या; धारधार हत्याराने वार करून विहरीत ढकलून दिले…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *