
दिल्ली : 17 ऑगस्टपासून आशिया चषक स्पर्धा सुरू झाली आहे,. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) या स्पर्धेत चमकदार कामगिरी करून भारताला विजेतेपद मिळवून देईल, अशी आशा सर्व भारतीय चाहत्यांना आहे. पण गेल्या 3 वर्षांपासून विराटला एकही आंतरराष्ट्रीय शतक मिळवता आलेले नाही. त्याच्या फॉर्मबद्दल चाहते आणि क्रिकेटपंडित सतत बोलत असतात. आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) कोहलीच्या भविष्याबाबत त्याचे मत मांडले आहे.
Sanjay Raut : संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम ‘एवढ्या’ दिवसांनी वाढला
आफ्रिदीने सोशल मीडियावर चाहत्यांशी गप्पा मारल्या विराट कोहलीच्या भविष्याबद्दल त्याला एक प्रश्न विचारण्यात आला, यावर आफ्रिदीने 5 शब्द लिहून प्रतिक्रिया दिली. त्या व्यक्तीने आफ्रिदीला प्रश्न केला आणि विचारले, ‘कोहलीच्या भविष्याबद्दल तुला काय वाटते?, या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना आफ्रिदीने लिहिले, ‘ते त्याच्या हातात आहे.
कोहलीबद्दल आफ्रिदीची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे, नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात २८ ऑगस्टला सामना होणार आहे. चाहते त्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.