Atiq Ahmed Murder Case : माफिया अतिक अहमदच्या कार्यालयात सापडले रक्ताचे डाग; पोलिसांनी सांगितली धक्कादायक माहिती

Atiq Ahmed Murder Case : Bloodstains found in mafia Atiq Ahmed's office; Shocking information told by the police

उत्तरप्रदेश (UP) मधील माफिया अतिक अहमदच्या ( Atiq Ahmad) कार्यालयात तपास करत असताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. याठिकाणी रक्ताचे डाग व रक्ताने माखलेला चाकू पाहून पोलीस देखील थक्क झाले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे याठिकाणी असणारे रक्ताचे डाग अगदी ताजे आहेत. तसेच रक्ताने माखलेल्या काही बांगड्या देखील पोलिसांना तपासात मिळाल्या आहेत. (Blood stains)

Sharad Pawar: महाविकास आघाडी एकत्र लढणार नाही? शरद पवारांच्या त्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात संभ्रम

अतिक अहमदच्या प्रयागराजमध्ये ( Prayagraj) चकिया येथे कार्यालय आहे. या कार्यालयाची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे. याठिकाणी पहिल्या मजल्यावर पोलिसांना एका महिलेची साडी व अंतर्वस्त्रे पडलेली सापडली. अतिकच्या कार्यालयात एका महिलेचा खून करून तिचा मृतदेह बाहेर कुठेतरी फेकून दिला गेला आहे. असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Gautami Patil: गौतमीच्या डान्समुळे लावणी कलाकारांची डोकेदुखी वाढली; प्रेक्षक म्हणतात, “आम्हाला फक्त गौतमीसारखा डान्स…”

दोन वर्षांपूर्वी योगी सरकारने अतिकचे कार्यालय पाडले आहे. या कार्यालयाचे काही अवशेष अजूनही तसेच असून निम्म्याहून अधिक भाग बुलडोझरने पाडला आहे. या कार्यालयात पोलिसांना संशयास्पद गोष्टी आढळल्याने सखोल तपास सुरू झाला आहे. याबाबत लवकरच माहिती देण्यात येईल असे प्रयागराजचे एसपी सत्येंद्र तिवारी यांनी म्हंटले आहे.

Tarek Fateh: मोठी बातमी! पाकिस्तानी लेखक तारेक फतेह यांचं दुःखद निधन

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *