Supriya Sule: “मुळात ही महाराष्ट्राची संस्कृती कधीही नव्हती”, RSS च्या बंदीवर सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

"Basically this was never the culture of Maharashtra", Supriya Sule's big statement on RSS ban

मुंबई: राष्ट्रीय तपास यंत्रणेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरुद्ध (पीएफआय) धडक कारवाई केली आहे. दरम्यान या कारवाईत मंगळवारी एकाच दिवशी पीएफआय (PFI) संघटनेशी संबंधित असलेल्या १५० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले तर काहींना अटक करण्यात आली. तसेच महत्वाची बाब म्हणजे केंद्र सरकारने आता यांना बेकायदेशीर संघटना ठरवत बंदी घालण्याचा निर्णय घेतला. पीएफआयवरील बंदीनंतर आता अनेकांकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही (RSS) बंदी घालावी, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी मत व्यक्त केले आहे.

Satara: प्री-वेडींग शूट करायचय? मग आता सातारा बनतंय प्री-वेडींग डेस्टीनेशनचे माहेरघर

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

सुप्रिया सुळे आज सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या म्हणाल्या की, “केंद्र सरकारने पीएफआयवर लावलेल्या बंदीचे स्पष्टीकरण दिले पाहिजे. तसेच जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अशा बंदीची कोणी मागणी असेल तर त्यांनी कुठलीही गोष्ट करताना समाजात त्याची चर्चा झाली पाहिजे. कारण देशात ज्या काही गोष्टी होतील, त्या संविधानाच्या चौकटीत राहून केल्या पाहिजे. महत्वाची बाब म्हणजे सर्वांना समान न्याय दिला पाहिजे”, इतकंच नाही तर पीएफआयवरील बंदी संदर्भात संसदेतदेखील केंद्र सरकारला स्पष्टीकरण विचारणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Ajit Pawar: अजित दादा फडणवीसांकडून घेणार हे ट्रेनिंग?, केली मिष्किल टिप्पणी

ही महाराष्ट्राची संस्कृती

पुढे बोलताना सुप्रिया सुळे यांनी “केंद्रीय तपास यंत्रणांकडून विरोधीपक्षांवर होणाऱ्या कारवाईवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की,” गेल्या काही दिवसांत ९० छापे हे विरोधीपक्षाच्या नेत्यांवर झाले आहेत. इतकंच नाही तर भाजपा लॉंड्रीत आल्यानंतर अनेकांची सुटका होते, असे भाजपाचेच नेते म्हणतात.पण मुळात ही महाराष्ट्राची संस्कृती कधीही नव्हती. आणि जे घडतय ते खूप दुर्दैवी आहे”, अस खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हातावर सूज आलीय? मग ‘या’ उपायांनी मिळेल आराम

सिलिंडरची कमतरता आहे का?

महागाई आणि सिलिंडरच्या वाटपावरूनही सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. “एकतर नवरात्र, दिवाळी आण त्यात केंद्र सरकारने एका महिन्याला केवळ २ सिलेंडर देण्याचा निर्णय केला आहे. आधी केंद्र सरकारने सिलिंडरची कमतरता आहे का? याचं उत्तर द्यायला हवं. कारण हे अत्यंत दुर्दैवी आहे.

शेतकऱ्यांसमोर नव संकट! ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर पडला खतांचा तुटवडा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *