
काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व पक्षचिन्ह शिंदे गटाच्या हाती दिले. सध्या शिंदे गटाकडून जोरदार पक्षबांधणी सुरू असून धडाधड निर्णय घेतले जात आहेत. दरम्यान ठाकरे गटातील नेत्यांची शिवसेनेत असणारी महत्त्वाची पदे संपुष्टात येणार अशी भीती राजकीय वर्तुळात होती.
राज्यात ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; यामध्ये तुमचा जिल्हा आहे का? वाचा एका क्लिकवर
ही भीती आता खरी ठरली असून शिवसेनेकडून संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी राज्यसभेतील शिवसेना मुख्य नेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. राज्यसभेतील शिवसेना मुख्य नेतेपदी आता शिंदे गटातील खासदार गजानन किर्तीकर असणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरेंना अनेक धक्के बसले. मात्र संजय राऊत यांची मुख्य नेते पदावरून हकालपट्टी होणे हा ठाकरेंसाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. याबाबत शिवसेनेच्या संसदीय पक्षाचे नेते राहुल शेवाळे ( Rahul Shewale) यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवले होते.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर 21 फेब्रुवारीला मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी गजानन किर्तीकर यांच्या नियुक्तीवर निर्णय घेण्यात आला होता. राहुल शेवाळे यांनी पत्राद्वारे ही माहिती लोकसभा अध्यक्षांपर्यंत पोहोचवली होती.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा; मोदींवर टीका करणे पडले महागात