मागच्या काही दिवसापासून ठाकरे गटाला (Thackeray group) चांगलीच गळती लागल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. ठाकरे गटातील अनेक बडे नेते तसेच कार्यकर्ते देखील शिंदे गटामध्ये (Shinde group) प्रवेश करत आहेत. यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेची ताकद वाढताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. (Former corporator Ashwini Matekar joined the Shinde group)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका अश्विनी माटेकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे बोलेल जात आहे. गुरूवारी अश्विनी माटेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
अश्विनी माटेकर यांच्यासह मुंबईमधील चांदिवलीतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश झाला. यामुळे ठाकरे गटाला चांगलीच गळती लागली आहे. अश्विनी माटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे.