कोथिंबीरीचे दर भिडले गगनाला, मात्र जनेतेच्या खिशाला कात्री

Coriander prices have skyrocketed, but people's pockets are cut

कोणताही पदार्थ बनवताना त्यात कोथिंबिरीचा सर्रास वापर केला जातो. चवीसाठी किंवा एखाद्या पदार्थाच्या सजावटीसाठी वापरली जाते. असा कोणताही पदार्थ नाही की ज्यामधे कोथिंबिरीचा वापर केला जात नाही. कोथिंबीर आरोग्यासाठी खूप गुणकारी देखील असते. तसेच कोथिंबिरीला व्यापारी वर्गाकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते.

कोंड्याची समस्या लिंबूने करा दूर, असं वापरा लिंबू

भाजीपाल्याला उच्च दर

दरम्यान मागील काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तसेच भाजीपाला पिकाचे पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे भाजीपाल्याचे पिक रानातच खराब झाल्याने सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सध्या पालेभज्या आणि कोथिंबीरचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

Supriya Sule: “मुळात ही महाराष्ट्राची संस्कृती कधीही नव्हती”, RSS च्या बंदीवर सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

कोथिंबिरीला सोन्याचा भाव, जनतेच्या खिशाला लागली कात्री

गेल्या काही दिवसापासून पाऊस सतत पडत आहे. दरम्यान सततच्या पावसामुळे कोथिंबीरचे पीक रानातच नासून गेले. कोथिंबिरीच उत्पादन कमी येत असल्याने सध्या बाजारात कोथिंबिरीला सोन्याचा भाव मिळत आहे. तसेच नाशिक बाजारात 200 रुपये एवढा उच्चांकी भाव कोथिंबीरच्या जुडीला मिळत आहे. या वाढलेल्या भावामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागलेली आहे. तसेच या वाढलेल्या भावामुळे शेतकरी वर्गाला बक्कळ नफा मिळत आहे.

Lumpy: नागपुरात गौ विज्ञान अनुसंधान केंद्राने केला दावा, आता गोमूत्र आणि आयुर्वेदिक उपचारानं लम्पीवर होणार मात

भाजीपाल्याच्या किमतीत एवढ्या रुपयांनी वाढ:-

भाज्यांची आवक घटल्यामुळे आणि कमी उत्पन्न मिळाल्यामुळे भाजीपाल्याच्या बाजार भावात 20 ते 30 रुपयांची वाढ झालेली दिसून येते. सध्या नाशिक बाजारात अद्रक 80 रुपये किलो,लवंगी मिरची 100 किलो,शेवगा 70 रुपये किलो,ढेमस् 60 रुपये किलो,काकडी 550 रुपये कॅरेट,टोमॅटो 1100 रुपये कॅरेट,कोबी 200 रुपये कॅरेट,कोथिंबीर 200 रुपये जुडी,कारले 50 रुपये किलो,भोपळा 300 रुपये कॅरेट,फ्लॉवर 150 रुपये कॅरेट असे भाजीपाल्याचे भाव आहेत.

Neeraj Chopra: गुजरातमध्ये चाहत्यांसोबत गरब्यावर थिरकताना दिसला गोल्डन बॉय नीरज चोप्रा; व्हिडिओ झाला प्रचंड व्हायरल

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *