
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं भोंग्याचे प्रकरण खूप गाजले त्यानंतर राज ठाकरे हे आयोध्या दौऱ्यावर जाणार होते मात्र ब्रूजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांनी राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याला विरोध केला हा विषय देशभरात खूप चर्चा रंगल्या होत्या.
दिपाली सय्यद (Dipali Sayyad) नेहमी राज ठाकरे आणि मनसेवर टीका टिपणी करत असतात. मात्र त्यांनी आता दिल्लीत ब्रुजभूषण सिंग यांची भेट घेऊन त्यांना मुंबईत येण्यासाठी निमंत्रण दिल आहे. राज ठाकरे ब्रुजभूषण सिंग यांना मुंबई दौऱ्यासाठी विरोध करतील का असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. ब्रजभूषण सिंग यांना मुंबईत बोलून दीपाली सय्यद यांनी मनसेला डीवचण्याचा प्रयत्न केला.
भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष ब्रुजभूषण सिंग हे जे बोलतात ते करून दाखवतात व ते एक धाडसी व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्रात महिला महाराष्ट्र केसरी लवकर व्हावी म्हणून विनंती केली. शरद पवार यांनी ब्रुजभूषण सिंग यांची भेट करून दिली त्यामुळे दिपाली सय्यद यांनी त्यांचे आभार मानले.