मुंबई : राज्याच्या अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. पुणे, मुंबईसह ठाणे परिसरात रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढच्या चार दिवस राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आलाय.
नवरात्रीमुळे केळीच्या दरात झाली वाढ, परंतु व्यापारी वर्ग चिंतेत
विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस झाला असताना, मुंबई शहरासह कोकण विभागात अनेक भागांत दरवर्षीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. पण , राज्यामधील सर्व विभागांतील धरणांमध्ये यावर्षी 90 टक्क्यांपेक्षा जास्त आणि समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे.
कोथिंबीरीचे दर भिडले गगनाला, मात्र जनेतेच्या खिशाला कात्री
मागच्या वर्षी मुंबईसह कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. मुंबई, पण यावर्षी मुंबई शहरात पावसाची सरासरी पूर्ण झालेली नाही. विदर्भामध्ये सरासरीच्या तुलनेत ३१ टक्के अधिक, तर मध्य महाराष्ट्रात २६ टक्के अधिक पाऊस झालाय. त्याचबरोबर मराठवाडय़ात देखील सरासरीपेक्षा २४ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे.
Diabetes: डायबिटीजसाठी ही भाजी आहे फायदेशीर, कोलेस्टेरॉल लेवलही होते कमी