![](http://elokhit.com/wp-content/uploads/2023/03/Rain-5.jpg)
सध्या सर्वांचे लक्ष आता मान्सूनकडे (Monsoon) लागून राहिले आहे. मान्सून कधी पडणार यावर राज्यातील शेतकऱ्यांची गणिते अवलंबून आहेत. अंदमान आणि निकोबार बेटांवर १९ मे पासून मान्सून अडकला होता. मात्र २९ मे पासून नैऋत्य मान्सूनने चांगलाच वेग पकडला आहे. यामुळे येत्या १५ जूनपासून राज्यातील बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Ambani Family | पुन्हा मुकेश अंबानी झाले आजोबा ! घरात आली छोटी लक्ष्मी …
तसेच हवामान खात्याच्या सांगण्यानुसार, मान्सूनने २२ ते २६ मे या कालावधीत अंदमान आणि निकोबार बेटे ओलांडून पुढे बंगालच्या उपसागरात सरकायला हवे होते. मात्र मान्सूनला त्या स्थितीत पोहोचण्यासाठी वेळ लागला आणि तो ३१ मे रोजी त्या स्थितीत पोहोचला. म्हणूनच नेहमीपेक्षा एक आठवडा उशिराने पाऊस आपले अस्तित्व दाखवत आहे.
त्यामुळे शेतातील कामे पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ सुरू झाली आहे. मान्सूनचा सध्याचा वेग पाहता १ जूनला कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ईशान्य मोसमी पाऊस केरळ तर तामिळनाडूमध्ये ५ जूनपर्यंत तो सुरू होईल, असा अंदाज आहे. याशिवाय १० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये पोहोचणार आहे.
येत्या १५ जूनपासून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या बहुतांश भागात मान्सूनचा पाऊस सुरू होईल. तर, २० जूनपासून राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू-काश्मीरपर्यंत पाऊस पडेल. मान्सूनचा हा संपूर्ण टप्पा ८ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात लवकरच पाऊस सुरू होईल.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला 12 हजार