Ambani Family | पुन्हा मुकेश अंबानी झाले आजोबा ! घरात आली छोटी लक्ष्मी …

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना ओळखले जाते. आनंदाची बातमी म्हणजे मुकेश अंबानी हे पुन्हा एकदा आजोबा झाले आहेत. श्लोका अंबानी (Shloka Ambani) आणि आकाश अंबानी (Aakash Ambani) यांनी नुकत्याच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आकाश आणि श्लोका यांना याआधी पृथ्वी हा मुलगा आहे. मध्यंतरी नीता मुकेश अंबानी यांच्या नावावर असलेल्या सांस्कृतिक केंद्राच्या (NMACC) उद्घाटन सोहळ्याची काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यामध्ये श्लोका अंबानीचा बेबी बंप दिसत होता. यानंतर ती आई होणार असल्याची बातमी चर्चेत आली होती.

Monsoon Update | आनंदाची बातमी ! राज्यात १५ जूनला मान्सून चे आगमन होणार ; हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचे मार्च २०१९ मध्ये लग्न झाले होते. खरंतर श्लोका आणि आकाश हे बालपणीचे मित्र आहेत. २०२० मध्ये श्लोकाने एका मुलाला जन्म दिला होता. त्याचे नाव पृथ्वी असे ठेवण्यात आले होते. पृथ्वी आणि त्याचे आजोबा मुकेश अंबानी आणि याचे फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात.

Wrestelers Protest | नरेश टिकैत यांच्या सांगण्यावरून महिला कुस्तीपटू गंगातीरावरुन माघारी ; सरकारला दिला ५ दिवसांचा अल्टीमेटम !

काही महिन्यांपूर्वी मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा साखरपुडा राधिका मर्चंटसोबत झाला होता. त्यानंतर मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. कृष्णा आणि आदिया असे या बाळांचे नामकरण करण्यात आले आहे. त्यानंतर आता अंबानी कुटुंबात एका लहान परीचे आगमन झाले आहे. यामुळे अंबानी कुटूंबात आनंदाचे वातावरण आहे.

Kharip Hangam | खरीप हंगामासाठी बियाणे, किटकनाशके आणि खते खरेदी करताय ? मग ही काळजी घ्याच, अन्यथा होईल नुकसान !

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *