“काहीच न मिळाल्यास ऊस तोडायला जाऊ”, पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य

"If we get nothing, go to cut sugarcane", Pankaja Munde's big statement

भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankja Munde) पुन्हा एकदा पक्षावर नाराज दिसत आहेत. इतकंच नाही तर खुद्द पंकजा मुंडे यांच्याकडून नाराजीचा सूर ऐकू येत आहे. खरे तर अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीत (Delhi) राष्ट्रीय समाज पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्या पक्षावर नाराज आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गौतमीचे वडील पहिल्यांदाच माध्यमांसमोर बोलेल, आडनावाच्या वादावर दिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “आडनाव लावू नको…”

पंकजा मुंडे म्हणाल्या की, “सध्यातरी आपल्याला राजकारणात काहीही मिळण्याची लालसा उरलेली नाही. समाजातील अखेरच्या व्यक्तीच्या विकासासाठी काम करत राहण्याचा सल्ला मला गोपीनाथ मुंडे यांनी दिला होता. त्यामुळे आपली पुढील वाटचाल कायम राहणार आहे. राजकारणात काहीच राहिले नाही तर ऊस तोडायला शेतात जायची आपली तयारी आहे.”

उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

याचवेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, “मी भाजप पक्षाची आहे. पण भाजप पक्ष माझा होऊ शकत नाही. ” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. पंकजा मुंडेंच्या बंडखोर वृत्तीनंतर आता राजकीय प्रतिक्रियाही समोर येत आहेत. पंकजा मुंडे यांनी परिणामांची पर्वा न करता निर्णय घ्यावा, असे शिवसेना उद्धव गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले.

The Kerala Story । अदा शर्मा हिने सांगितला चित्रपटाच्या शूटिंगवेळीचा धक्कादायक अनुभव; ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *