Jayant Patil ED | जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक! पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांनी दिल्या प्रतिक्रिया

Jayant Patil ED | NCP aggressive on Jayant Patil's ED inquiry! Reactions given by important leaders of the party

बहुचर्चित सत्तासंघर्षाच्या निकालादिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती. आयएल अँड एफएस कंपनीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जयंत पाटील यांना ही नोटीस आली होती. दरम्यान या प्रकरणी आज ईडीकडून जयंत पाटील यांची चौकशी होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील महत्त्वाच्या नेत्यांनी आपल्या विशेष प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच राज्यातील काही भागात याविरोधात आंदोलन देखील सुरू आहे. (Supriya Sule & Rohit Pawar on Jayant Patil’s ED notice)

Eggs | अंडे शाकाहारी की मांसाहारी? शेवटी प्रश्नाचं उत्तर मिळालंच…

जयंत पाटील आज चौकशीला जाताना सोबत दोन पुस्तक घेऊन गेले आहेत. कारण वेळ कसा घालवणार? सरकारने लग्नाच्या वाढदिवसादिवशी जयंत पाटलांना नोटीस पाठवून गिफ्ट दिले होते. अनिल देशमुख यांच्या घरीही ईडीने १०९ वेळा धाड टाकली. खरंतर हा जागतिक विक्रमच होता. आता भाजपचे पदाधिकारी म्हणतात की आता मला शांत झोप लागते. नवाब मलिक टीव्हीवर जे बोलले होते, ते आता खरे होत आहे. असे सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या आहेत.

भर लग्न मंडपात नवरा-नवरीची एकमेकांना तुफान मारहाण, व्हिडिओही झाला व्हायरल; पाहा Video

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जयंत पाटील यांच्या ईडी चौकशी वरून सोशल मीडिया पोस्ट करत सरकारवर ताशेरे ओढले आहेत. जयंत पाटील साहेबांना आलेल्या ED नोटीसीचा कर्नाटक निकालाशी संबंध आहे. अशा चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून विनाकारण त्रास देऊन विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा होत असलेला प्रयत्न हा सरकारला कदापि शोभणारा नाही. असं रोहित पवारांनी (Rohit Pawar) आपल्या पोस्ट मध्ये म्हंटले आहे.

शेवटी डॉक्टरच तो! मृत्यूनंतरही तब्बल ११ जणांना दिले जीवनदान

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *