कसबा, चिंचवड निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या बड्या नेत्यामध्ये नाराजी? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Kasba, Chinchwad election in the face of displeasure in the big leader of BJP? Inciting discussions in political circles

पुण्यात कसबा व चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या (Kasba and Chinchwad assembly by-elections in Pune) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. दोन्ही भागातील निवडणूका मविआ आणि भाजपसाठी प्रतिष्ठेच्या असल्याने दोन्हीकडून कंबर कसून प्रयत्न सुरू आहेत.

“…ही कोणत्या भूकंपाची चिन्ह असावीत? रोहित पवार यांचे ट्विट चर्चेत

आता कसबा पोटनिवडणुकीत भाजपची अंतर्गत नाराजी समोर आल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. भाजपचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनी प्रचाराला सहभागी होणार नसल्याची माहिती दिली आहे. याबाबत माहिती त्यांनी एक पत्रक जाहीर करत दिली आहे.

पायात घालायला नाहीत शूज! अन् 15 वर्षांची मुलगी सुर्यकुमार यादवच्या स्टाईलमध्ये मारते सिक्स

त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे देखील प्रचाराला उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे आता हे दोन बडे नेते प्रचाराला उपस्थित नसल्याने या नेत्यांच्या गैरहजेरीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

बाॅलिवूडला शिंदे- फडणवीस सरकारचा दणका ; बॉलीवूडवर नियंत्रण आणण्यासाठी लवकरच नियमावली होणार जारी

खासदार गिरीश बापट यांची तब्बेत ठीक नसल्यामुळे ते प्रचाराला उपस्थित राहणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. त्यांना आठवड्यामधून जवळपास तीन वेळा डायलिसिस करावा लागतो यामुळे डॉक्टरांनी त्यांना बाहेर न फिरण्याचा सल्ला त्यांना दिलाय. यामुळे ते प्रचाराला उपस्थित राहणार नाहीत.

चक्क 61 वर्षे न झोपलेल्या माणसाबद्दल वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *