MPSC: एमपीएससीकडून तीन महिने आधीच 2023च्या पदभरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, कारण…

MPSC released the 2023 recruitment exam schedule three months in advance, because….

मुंबई : बुधवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात येणाऱ्या विविध पदभरती (recruitment) परीक्षांचे तीन महिने आधीच वेळापत्रक (Time Table) जाहीर करण्यात आले. याचं महत्वाचं कारण म्हणजे 2023 पासून भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे उमेदवारांना (candidates) तयारीसाठी वेळ मिळावा या हेतूने दरवर्षीपेक्षा तीन महिने आधीच वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ कारणांमुळे कांद्याचा भाव 20 ते 30 टक्क्यांनी वाढणार

वेळापत्रकात या पदांचा समावेश

एमपीएससीच्या या वेळापत्रकात दिवाणी कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2023, महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त परीक्षा 2023 अंतर्गत सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक आदी पदांचा समावेश आहे. तर महाराष्ट्र नागरी सेवा 2023 राज्यसेवेअंतर्गत 33 संवर्गातील पदे, वनसेवा, अभियांत्रिकी सेवा, कृषी सहायक आदी पदांचा समावेश आहे.

Prajakta Mali: “…त्याचा प्रवास तर फारच ह्रदयाजवळचा आहे”, प्राजक्ता माळीची ती इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत

2023 पासून एमपीएससीने एमसीक्यू स्वरुपाची परीक्षा पद्धत बंद करून वर्णनात्मक पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु उमेदवारांकडून ही नवी पद्धत 2025पासून लागू करण्याची मागणी केली जात आहे. तसेच एमपीएससीचे सहसचिव सुनील अवताडे म्हणाले की, एमपीएससी आयोगाने १ ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार 2023 पासून परीक्षा पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. दरम्यान उमेदवारांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून नेहमीपेक्षा तीन महिने आधी वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले.

Devendra Fadnavis: पीएफआय’वर भारतात बंदी! देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत केला मोठा खुलासा, म्हणाले…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *