“आता स्त्रियांनी…”, महिला दिनानिमित्त राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

"Now women...", Raj Thackeray's Facebook post on Women's Day is in discussion

आज ८ मार्चला जगभरात वेगेवेगळ्या प्रकारे महिला दिन साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर महिला दिनाच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे सध्या ही फेसबुक पोस्ट खूप चर्चेत आहे.

धक्कादायक! शिळे अन्न खाल्ल्यामुळे बारावीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

पाहा राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट –

आज जागतिक महिला दिन. सर्वप्रथम तमाम स्त्रीवर्गाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. सगळ्या चौकटी मोडून, आज सर्वच क्षेत्रामंध्ये स्त्रियांची जी घौडदौड सुरु आहे ती थक्क करणारी आहे. आज ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील, इथल्या मुलींना उच्च शिक्षणाची , स्वतःच करिअर घडवायची प्रचंड ओढ आहे. आणि त्यासाठी त्या घरापासून लांब, इतर शहरांत किंवा परदेशांत नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने सहज स्थिरावत आहेत, आणि जिथे जातील तिथे स्वतःचा ठसा उमटवत आहेत. हे चित्र आनंददायी आहे.

१००,१५० वर्षांपूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून प्रचंड संघर्ष करावा लागत होता अशी परिस्थिती होती. आणि त्याच समाजात मोठमोठ्या उद्योगसमूहांच्या व्यवस्थापनापासून ते जागतिक अर्थकारणात उलाढाली करणाऱ्या संस्थांमध्ये मोठ्या पदांवर स्त्रिया कार्यरत आहेत. इतकंच काय देशाची अर्थव्यवस्था, परराष्ट्र व्यवहार, सीमांचं संरक्षण ते थेट राष्ट्रपतीपदी स्त्रिया आपला ठसा उमटवत आहेत. आणि हे सर्व त्यांनी निव्वळ स्वकर्तृत्वावर कमावलं आहे.

म्हणूनच आता स्त्रियांनी आता राजकारणात देखील मोठ्या प्रमाणावर यायला हवं. ‘जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं’ हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ध्येय आहे, आणि हे साध्य करायचं असेल तर स्त्रियांचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा आहे, ह्याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच विविध क्षेत्रांत स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्सुक आहे. पुन्हा एकदा सर्व महिलांना, जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

तुम्हाला सतत मोबाईल पाहण्याची सवय आहे का? असेल तर आताच बदला नाहीतर तुमचा ब्रेन…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *