वैष्णवी देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर काळाने झडप घातली. काल सकाळी सात वाजण्याच्या सुमारास श्रीनगर – जन्मु महामार्गावर असणाऱ्या झाज्जर कुठली भागात भाविकांच्या बसचा अपघात झाला. हा अपघात प्रचंड भीषण होता. अपघातात बसमध्ये असणाऱ्या १० यात्रेकरूंचा जागीच मृत्यू झाला तर ५७ भाविक जखमी झाले आहेत.
भाविकांची बस वैष्णवी देवीच्या दर्शनासाठी चालली होती. दरम्यान, बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. पूलाचे रोलिंग तोडत बस सुमारे ५० फूट खाली कोसळल्याने अपघाताची घटना घडली. या अपघाताची माहिती मिळताच, बचाव पथक, राज्य राखीव पोलीस दलाचे पथक आणि स्थानिक पोलीस तात्काळ बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वेगाने बचाव कार्य केले. जखमी रुग्णांना तात्काळ पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
Ambani Family | पुन्हा मुकेश अंबानी झाले आजोबा ! घरात आली छोटी लक्ष्मी …
या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या भाविकांमध्ये बहुतांश भाविक बिहारचे असल्याचे समजते. दरम्यान, या अपघाताबद्दल, राष्ट्रपती द्रोपती मुर्मू, जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला. अपघातामध्ये जखमी झालेल्या ५७ भाविकांवर जम्मूमधील जीएमसी रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत.