
स्वतःच्या हक्काची एखादी भारी गाडी घेणे, हे प्रत्येक सामान्य माणसाचे स्वप्न असते. बाजारात अनेक ब्रँडच्या दुचाकी गाड्या आहेत. मात्र, यामध्ये रॉयल एनफिल्ड बुलेट (Royal Enfild) ही लोकांच्या हृदयावर राज करणारी गाडी आहे. या गाडीवरून फिरण्याचा मोह कुणालाच आवरत नाही. या गाडीचा थाटच लोकांना अगदी राजेशाही ( Royal) वाटतो. म्हणूनच गेल्या काही वर्षात रॉयल एनफिल्ड च्या विक्रीत वाढ झालेली पहायला मिळते. परंतु, तरी देखील तुम्ही ही गाडी घ्यायचा विचार करत आहात तर काही गोष्टींचा एकदा विचार कराच, अन्यथा भविष्यात चांगलाच पश्चात्ताप करावा लागेल.
1) गाडीची किंमत
रॉयल एनफिल्ड ही गाडी लोकांच्या पसंतीची गाडी आहे. यामुळे या गाडीची किंमत एक लाखाच्या वरती आहे. परंतु, एक लाखामध्ये तुम्ही त्यापेक्षा अधिक चांगल्या गुणवत्तेची गाडी खरेदी करू शकता. महत्त्वाची बाब म्हणजे या गाडीच्या स्पेअर पार्ट आणि ऍक्सेसरीज देखील महाग आहेत. इतकंच नाही तर रॉयल एनफिल्डच्या सर्व्हिसिंगची किंमत सुद्धा जास्त आहे. या कारणामुळे कमी किंमतीत जास्त फायदा देणारी गाडी खरेदी करणाऱ्या लोकांसाठी रॉयल एनफिल्ड योग्य नाही.
धक्कादायक! पगार न झाल्यामुळे एसटी चालकाने आत्महत्या करत संपवले आयुष्य
2) रॉयल एनफिल्ड गाडीचा आवाज व व्हायब्रेशन
रॉयल एनफिल्ड बुलेटचा आवाज जास्त आहे. ही गाडी अतिशय व्हायब्रेट होते. ही गाडी जेव्हा तुम्ही ८० किंवा जास्तच्या स्पीडला पळवता, तेव्हा मिरर व्हाब्रेशनमुळे थरथरत असतात. यामुळे रियर व्ह्यू मिररमध्ये काहीच व्यवस्थित पाहता येत नाही. तसेच हँडलबार आणि फूटपेग्ज्स देखील व्हायब्रेट होतात. त्यामुळे गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला खूप त्रास होतो.
ठरलं! शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ‘या’ तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा १३वा हप्ता
3) कमी मायलेज व पॉवरची कमतरता
रॉयल इनफिल्ड बुलेटचे इंजिन 350 cc चे आहे. या गाडीचे इंजिन मोठे असल्यामुळे जास्त इंधन वापरले जाते. यामुळे बाईक चालवण्याचा खर्च जास्त येतो. तसेच रॉयल एनफिल्ड बुलेटमध्ये पॉवरची कमतरता आहे, ही गाडी ज्यावेळी तुम्ही 100 पेक्षा अधिक स्पीडवर राईड करता तेव्हा इंजिन तुटून पडते की काय ? असे सतत वाटत राहते.
4) जास्त वजन व खराब ब्रेक्स
रॉयल एनफिल्ड बुलेट बनवताना मेटलचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. यामुळे ती अतिशय जड असते. याचा तोटा असा होतो की, ट्रॅफिक किंवा अपघाताच्या ठिकाणी एकट्याने गाडी सावरणे अवघड जाते. याशिवाय रॉयल एनफिल्ड बुलेटचे ब्रेक खराब आहेत. ते सहज लॉक होतात. यामध्ये रिअर डिस्क नसल्याने दर 100 मीटर ला ब्रेक फिक्स करावे लागतात.
कसबा, चिंचवड निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या बड्या नेत्यामध्ये नाराजी? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण