
मुंबई : सलमान खान (Salman Khan नेहमीच आपल्या दबंग अंदाजासाठी ओळखला जातो.सलमानची प्रत्येक स्टाईल चाहत्यांना देखील आवडते. सलमानचे चाहते त्याच्यावर फिदा आहेत.दरम्यान अशातच सलमानचा एक व्हिडिओ समोर आला आहे.या व्हिडिओला सलमानच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.या व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये सलमान खान एका पार्टीवरून जात असताना चक्क ग्लासच आपल्या जीन्सच्या खिशात टाकतना दिसतोय.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.सलमान खान एका पार्टीला गेला तेव्हा त्याच्या हातात ग्लास होता.दरम्यान गाडीतून खाली उतरताना देखील सलमानच्या हातात ग्लास होता दरम्यान सलमानने थेट ग्लासच आपल्या पँटच्या खिशात घातला.आता चाहत्यांना मात्र प्रश्न पडलाय की त्या ग्लासमध्ये नेमकं आहे तरी काय ? आणि महत्वाचं म्हणजे सलमान खान तो काचेचा ग्लास सोडायला तयार का नाही.
विशेष म्हणजे ट्रोल न करता सलमाचा हा दबंग अंदाज चाहत्यांना सुद्धा खूपच आवडला आहे.सलमानच्या या खिशात ग्लास ठेवण्यावर अनेकांनी त्या ग्लासात सलमानचे औषध असल्याचे म्हंटले आहे तर अनेकांनी तो डायट फॉलो करत असल्याचे म्हंटले आहे.या व्हिडिओमुळे सलमानच्या अनेक चाहत्यांनी वेगवेगळे तर्क वितर्क लावले आहेत.