
एकेकाळी सलमान खानचा ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटामुळे सलमान खान व भाग्यश्री ही जोडी प्रचंड प्रसिध्द झाली होती. दरम्यान एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री भाग्यश्रीने सलमान खान (Salman Khan) सोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. सलमान खानच्या स्वभावातील दोन बाजू भाग्यश्रीने (Bhagyashree) या मुलाखतीमध्ये मांडल्या असून तिच्या मानत सलमान खानबद्दल प्रचंड आदर असल्याचेही तिने सांगितले आहे.
एमसीस्टॅन होता वाईट संगतीत! मात्र आईवडिलांनी घेतला ‘हा’ निर्णय आणि बदलले आयुष्य
‘मैने प्यार किया’ या चित्रपटाच्या प्रमोशन वेळीचा किस्सा भाग्यश्रीने या मुलाखतीमध्ये सांगितला. यावेळी ती म्हणाली की, “एका प्रसिद्ध फोटोग्राफरला माझे आणि सलमानचे काही सेन्सेशनल फोटो काढायचे होते. त्यामुळे त्यांनी सलमानला एका बाजूला घेऊन मला किस करण्यास सांगितले. परंतु मी काही बोलायच्या आधीच सलमानने असे करण्यास त्यांना नकार दिला. यामुळे माझ्या मनात त्याच्याबद्दल आदर वाढला.”
अजित पवारांची शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका; म्हणाले, “आज बेरोजगारी मोठ्या प्रमाणात…”
यानंतर सलमानच्या स्वभावाची दुसरी बाजू दाखवताना भाग्यश्रीने दुसरा किस्सा सांगितला आहे. ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटाचे शूटिंग सुरु असताना त्याने एकदा भाग्यश्रीला सांगितले होतं की, ‘चांगल्या मुलींनी माझ्यावर प्रेम करू नये असं मला वाटतं.’ त्यावर भाग्यश्रीने त्याला विचारलं की, ‘असं का?’ तर तो म्हणाला, ‘कारण मला वाटतं की मी चांगला मुलगा नाही. मी एकाच मुलीबरोबर दिर्घकाळ राहू शकत नाही. मी लवकरच कंटाळतो. जोपर्यंत मी यावर गोष्टी कंट्रोल करायला शिकत नाही तोपर्यंत मला वाटतं की मी चांगल्या मुलींपासून दूर राहावं.’ हा किस्सा सांगितल्यानंतर भाग्यश्री म्हणाली की, आज जेव्हा मी सलमानला बघते तेव्हा समजते की त्याने खरेच सांगितले होते.
कसबा चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बजावले ‘हे’ आदेश; वाचा सविस्तर