
शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बद्दल पत्रकारांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारला होता. त्यावेळी संजय राऊत बाजूला बाजूला थुंकले. त्यांच्या या कृतीमुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. यादरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी त्यांना सल्ला दिला होता. त्यावर धरणात मोजण्यापेक्षा थंकलेले चांगले, असा पलटवार संजय राऊत यांनी अजित पवार केला. मात्र या वक्तव्याबद्दल संजय राऊत यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
भीषण अपघात! कोंबड्या वाहून नेणाऱ्या दोन पिकअपची एकमेकांना जोरदार धडक
संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर कठोर शब्दात टीका केली. त्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले होते. दरम्यान, त्यांनी सामंजस्य भूमिका घेत प्रसार माध्यमांशी बोलताना दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले, पत्रकारांनी मला अजित पवारांबद्दल अर्धवट माहितीवर प्रश्न विचारला.त्यामुळे मी त्यांना कडक शब्दात उत्तर दिले. ते अजित पवार असे बोलले नव्हते. माझा आणि त्यांचा स्वभाव सारखाच आहे. मी तसे बोलायला नको होते.मला त्याबद्दल खेद वाटत आहे, असे सांगत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
ओडिशा दुर्घटनेनंतर तब्बल 51 तासांनी रेल्वे पुन्हा सुरू!
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, आम्ही सगळे एकमेकांचे सहकारी आहोत. अजित पवार हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत. पवार कुटुंबाशी माझे अत्यंत स्नेहाचे संबंध आहेत. यापुढे संपूर्ण माहिती घेऊनच बोलेल, असे संजय राऊत यांनी सांगितले.
ब्रेकिंग! ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे निधन, सिनेसृष्टीत शाेककळा
संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर कठोर शब्दात टीका केल्यानंतर, अजित पवारांनी सामंजस्याची भूमिका घेतली. संजय राऊत हे महान नेते आहेत. त्यांच्या बोलण्याने काय अंगाला छिद्र पडत नाही. त्यांनी काय बोलावे हे त्यांचा अधिकार आहे. ही आपली संस्कृती नाही. त्यांचा मी आदर करतो. मला त्याबद्दल काही बोलायचं नाही, असे सांगत अजित पवारांनी वादावर पडदा टाकला. संजय राऊत यांनी देखील दिलगिरी केली. त्यामुळे शाब्दिक वाद संपत असल्याचे संकेत दोन्ही नेत्यांनी दिले आहेत.