Site icon e लोकहित | Marathi News

Gulabrao Patil: “…मग 5 आमदारही उद्धव ठाकरेंकडे उरणार नाहीत” , गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा

"...then even 5 MLAs will not be left with Uddhav Thackeray", Gulabrao Patal targeted Uddhav Thackeray

मुंबई : शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. दरम्यान अशातच त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली आहे. धनुष्यबाण चिन्ह (Bow and arrow symbol) शिवसेनेकडून (Shivsena) गेल्यास उद्धव ठाकरेंना पाच आमदारांचा देखील पाठिंबा राहणार नाही, असा निशाणा गुलाबराव पाटलांनी साधला आहे.

नवरात्रीमुळे केळीच्या दरात झाली वाढ, परंतु व्यापारी वर्ग चिंतेत

इतकंच नाही तर पुढे बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, मिलिंद नार्वेकरही आमच्याकडे येणार असल्याचं आम्ही ऐकतोय. गुलाबराव पटलांनंतर दुसरीकडे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे देखील शिवसेनेवर घणाघात करण्यास मागे सरकले नाही. ते म्हणाले की, मला कुत्र हे चिन्ह दिलं तरी मी निवडून येईल असं सत्तार यांनी म्हटलं आहे.

कोथिंबीरीचे दर भिडले गगनाला, मात्र जनेतेच्या खिशाला कात्री

नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?

गुलाबराव पाटील उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधत म्हणाले की, “जर धनुष्यबाण चिन्ह गेलं तर उद्धव ठाकरे यांच्याकडे पाच आमदार देखील राहणार नाही. इतकंच नाही तर बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू म्हणजे चंपासिंग थाप. त्यांनी देखील आपलं संपूर्ण आयुष्य बाळासाहेबांच्या चरणी घातलं. विशेष म्हणजे ते चंपासिंग थापा देखील शिवसेनेला सोडून आले. तसेच आता मिलिंद नार्वेकरही आमच्याकडे येणार असल्याचं आम्ही एकतो आहे” असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

Diabetes: डायबिटीजसाठी ही भाजी आहे फायदेशीर, कोलेस्टेरॉल लेवलही होते कमी

Spread the love
Exit mobile version