
पदवीधरच्या निवडणुका पार पडल्यानंतर राज्यात आता पिंपरी-चिंचवड व कसबा पोटनिवडणुकीची लगबग सुरू आहे. आज या निवडणुकीसाठीचे उमेदवार जाहीर होणार आहेत. यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे.
आमदार मुक्ता टिळक ( Mukta Tilak) यांच्या निधनानंतर कसबा पोटनिवडणुक जाहीर करण्यात आली आहे. फेब्रुवारी च्या शेवटच्या आठवड्यात 26 तारखेला कसबा पोटनिवडणुकीचे मतदान पार पडणार आहे. कसबा मतदारसंघात भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रासने यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल होईल.
शरद पवारांनी ‘ते’ विधान करताच सभागृहात पिकला हशा! थेट इंदुरीकर महाराजांनाच केले टार्गेट
दरम्यान, महाविकास आघाडीने अजूनही उमेदवार जाहीर केलेला नाही. याबाबत लवकरच घोषणा होऊ शकते. महाविकास आघाडीचे उमेदवार देखील आजच अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे आज रात्रीपर्यंत कसबा पोटनिवडणुकीतील ( Kasba Election) उमेदवारांचे चित्र स्पष्ट होईल.
मोठी बातमी! सुप्रिया सुळेंच्या संपत्तीत 173 टक्क्यांची वाढ
नगरसेवक रवींद्र धंगेकर, कमल व्यवहारे आणि बाळासाहेब दाभेकर यांच्या नावाची महाविकास आघाडीकडून चर्चा आहे. यामध्ये रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान भाजप व महाविकास आघाडीचे उमेदवार आज कसबा गणपती जवळ आमने सामने येणार आहेत. यानंतर ते एकत्र दगडूशेठ गणपतीचे दर्शन देखील घेणार आहेत.
उर्फी जावेदच्या कपडद्याबद्दल अभिनेत्री अलका कुबल यांचे मोठे वक्तव्य; म्हणाल्या…