
यंदाच्या आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians) फार चांगली अशी कामगिरी केलेली नाही. यामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते नाराज आहेत. दरम्यान रोहित शर्माचा आयपीएल मधील खेळ पाहता माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी मोठे विधान केले होते. रोहित शर्माला ( Rohit Sharma) सध्या विश्रांती घेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले होते. दरम्यान विराट कोहलीने रोहित शर्माबाबत एक मोठा खुलासा केला आहे. यामध्ये त्याने रोहितच्या एका चुकीच्या सवयीची माहिती दिली आहे.
राज्यात पावसाचा रुद्रावतार! १० जणांचा झाला मृत्यु; पाळीव प्राण्यांनी देखील गमावला जीव
एका शो मध्ये विराट कोहली (Virat Kohali ) म्हणाला की, ” मी आजपर्यंत रोहित शर्मा सारखा विसरभोळा माणूस पाहिलेला नाही.” खरंतर विराट कोहलीने पाच वर्षांपूर्वी हे वक्तव्य केले होते. मात्र सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. रोहित शर्मा बऱ्याचदा आपला मोबाईल, लॅपटॉप विसरून जातो. अन नंतर म्हणतो की , जाऊ दे नवीन घेतो.
Uorfi Javed: उर्फी जावेदचा नवीन व्हिडिओ व्हायरल; अतरंगी लुकमुळे रेस्टॉरंटमध्ये नो एन्ट्री!
एवढच नाही तर बसमधून अर्धा प्रवास झाल्यावर रोहितला आठवते की, रूममध्ये आयपॅड किंवा इतर वस्तू विसरलो आहे. खूपदा तो पासपोर्ट सुद्धा विसरला आहे. रोहितच्या याच विसरभोळेपणामुळे लॉजिस्टिक मॅनेजर बस सुटण्यापूर्वीच रोहितने सर्व सामान घेतले आहे का? याची खात्री करून घेतो. रोहितची ही सवय फारच घातक आहे. अशी माहिती विराट कोहलीने दिली आहे.
रत्नागिरी रिफायनरी बाबत घेण्यात आले महत्त्वाचे निर्णय! उदय सामंत यांनी घेतली महत्त्वाची बैठक