नवरात्रीमुळे केळीच्या दरात झाली वाढ, परंतु व्यापारी वर्ग चिंतेत

Banana prices rise due to Navratri, but traders are worried

सध्या राज्यात (Maharashtra) नवरात्रमुळे केळीला (banana) प्रति टन १० ते १५ हजार रुपये भाव (price) मिळत आहे. मागच्या महिन्यापासून म्हणजे गणपतीपासून केळीला प्रति टनामागे २ ते ३ हजार रुपयांची वाढ झालेले आहे. केळीची मागणी नवरात्रीमुळे जास्त आहे. परंतु केळीचा पुरवठा कमी असल्यामुळे हे भाव असेच राहतील अशी शक्यता आहे. मागील सहा महिन्यांपासून केळीच्या दरात चढ उतार होत होता. तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने केळीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण केली. महत्वाची बाब म्हणजे राज्यात केळीला चांगला भाव मिळत नसेल तरी सध्या पुरवठ्याच्या दृष्टिकोनातुन कमी केळी असल्याने भाव स्थिर राहिलेला आहे.

कोथिंबीरीचे दर भिडले गगनाला, मात्र जनेतेच्या खिशाला कात्री

सणामुळे केळीचे दर मोठ्या प्रमाणात वाढणार

मागच्या महिन्यात गणपती उत्सवाच्या वेळी नागरिकांकडून केळीची मागणी जास्त होती. त्यामुळे आता नवरात्रीमध्ये
केळीच्या दरात पुन्हा सुधारणा झाली. नवरात्रच्या सणामुळे केळीचे दर मोठ्या प्रमाणात वाढतील जे की प्रति टन १८ ते २१ हजार रुपये कडे जातील अशी अपेक्षा आहे मात्र ती अपेक्षा पूर्ण होताना काही दिसत नसल्याचे चित्र पाहायला भेटत आहे. राज्यात सध्या केळीचा सरासरी भाव १२ ते १३ हजार रुपये वर गेलेला आहे. जे की नवरात्र चालू होऊन चार दिवस झाले तरी अजून केळी चा प्रति टन दर हा १० ते १५ हजार रुपये च आहे.

कोंड्याची समस्या लिंबूने करा दूर, असं वापरा लिंबू

केळीची मागणी राहणार कायम

गणेशोत्सव झाले, आता नवरात्रोत्सव त्यानंतर दिवाळी. एकामागे एक सलग सण आल्यामुळे केळीला पुढील एक दोन महिने मोठ्या प्रमाणावर मागणी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच केळीचे दर देखील उतरणार नाहीत अशी व्यापारी वर्गाकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. इतकंच नाही तर बागायतदार सांगतात की सध्याचे भाव हे अगदी कमी प्रमाणात दर भेटण्यापेक्षा समाधानकारक आहेत.

Diabetes: डायबिटीजसाठी ही भाजी आहे फायदेशीर, कोलेस्टेरॉल लेवलही होते कमी

केळीचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा :-

जेव्हा केळीचे दर मोठया प्रमाणावर सुरू होते तेव्हा केळीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर तुटवडा होता. परंतु सध्या व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे, कारण तिथे केळीची उपलब्धता कमी आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र मध्ये खानदेश, सोलापूरच्या तुलनेमध्ये केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. इतकंच नाही तर स्थानिक भागातील बागायतदार देखील सांगतात की केळीची उपलब्धता खूप कमी प्रमाणात आहे.

Supriya Sule: “मुळात ही महाराष्ट्राची संस्कृती कधीही नव्हती”, RSS च्या बंदीवर सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *