
बऱ्याचदा बिबटे, लांडगे, वाघ यांसारखे प्राणी शेतकऱ्यावर हल्ला करत असतात. शेतकऱ्यांवर वन्य प्राण्याने हल्ला केल्याच्या घटना कायम कुठे ना कुठे घडत असतात. सध्या अशीच एक धक्कदायक घटना खेड तालुक्यातील भिवेगाव या ठिकाणी घडली आहे. या ठिकाणी एका बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.
बृजभूषण सिंह यांनी राजीनामा देण्यास दिला स्पष्टपणे नकार!
भिवेगाव परिसरामध्ये घनदाट जंगलचा भाग आहे. या ठिकाणाहून शेतकरी शेतीच्या कामानिमित्त सतत येत-जात असतात. अनेक वर्षांमध्ये या शेतकऱ्यांना कोणत्याही वन्य प्राण्यांनी त्रास दिला नाही. मात्र मागच्या काही दिवसापासुन या परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढत आहे. त्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावणर निर्माण झाले आहे.
बिग ब्रेकिंग! माजी आरोग्यमंत्र्यांच्या गाडीचा भीषण अपघात
माहितीनुसार, जनावरे चारण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याला बिबट्याने झडप मारून ठार केले आहे. शेतकऱ्याचा आरडण्याचा आवाज ऐकून तेथील शेजारचे लोक पळत आले मात्र तोपर्यंत शेतकऱ्याने जीव गमावला होता.
“संजय राऊत वेड्यांच्या रूग्णालयामध्ये होते की…”, ‘या’ मनसे नेत्याची राऊतांवर जहरी टीका